१. श्री विष्णवे नमः ।
‘आपण आपल्या मनावर संयम ठेवू शकत नाही. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं सातत्याने उफाळून येत असतात. त्यांवर मात करण्यासाठी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करूया.
२. श्री सिद्धिविनायकाय नमः ।
आपल्यात भरपूर स्वभावदोष आणि अहं आहेत. मनाची शुद्धी होण्यासाठी सात्त्विक बुद्धी हवी. ती श्री सिद्धिविनायक देतो; म्हणून त्याला शरण जाऊन प्रयत्न वाढवूया.
३. श्री भवानीदेव्यै नमः ।
स्वभावदोष आणि अहं घालवण्याएवढी आपली क्षमता नाही. त्यांवर मात करण्यासाठी भवानीदेवीला शरण जाऊया.
आपल्यातील ईश्वरी तत्त्वाची वाढ होण्यासाठी आपण भावपूर्ण नामजप करूया.’
– सौ. मीना यशवंत शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.७.२०२०)