जपान सरकार ‘मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस’ (एकाकीपणा मंत्रालय) नावाचे मंत्रालय स्थापन करणार !

भारतातील तथाकथित विज्ञानवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी बोलतील का ?

कोरोना महामारीमुळे वर्ष २०२० मध्ये जपानमध्ये अनेक नागरिकांनी एकाकीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. जवळपास ११ वर्षांनंतर आत्महत्येच्या प्रकरणांची मोठ्या प्रमाणावर नोंद करण्यात आली. त्यानंतर आता जपान सरकारने ‘मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस’ (एकाकीपणा मंत्रालय) नावाचे मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून लोकांच्या एकाकीपणावर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे खाते पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्या अखत्यारीत असणार आहेे.

(जीवनाचा उद्देश शाश्‍वत अशा आनंदाची प्राप्ती करून घेणे असतांना जपानसारख्या अत्यंत प्रगत अशा वैज्ञानिक देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतात आणि त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे लागते, याचा विचार भारतातील तथाकथित विज्ञानवाद्यांनी अन् वैज्ञानिक जाणीवांसारखे कार्यक्रम राबवणार्‍यांनी केला पाहिजे ! – संपादक)