अमेरिकेने सौदी अरेबियावर निर्बंध लादले

  • नागरिकांच्या व्हिसावरही बंदी

  • पत्रकार जमाल खाशोगी हत्येचे प्रकरण

वॉशिंग्टन (अमेरिका) – सौदी अरेबियाचे पत्रकार आणि अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये स्तंभलेखन करणारे जमाल खाशोगी यांच्या हत्येला सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान यांनीच अनुमती दिल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी अहवालात दिल्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियावर काही निर्बंध लादले आहेत. यात सौदीच्या नागरिकांच्या व्हिसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र या निर्णयातून राजकुमार महंमद बिन सलमान यांनाच वगळण्यात आले आहे. पत्रकार जमाल खाशोगी यांची २ ऑक्टोबर २०१८ मध्ये तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या करण्यात आली होती.