सातारा – जी.एस.टी. नियमांच्या अन्यायकारक अटी आणि ऑनलाईन व्यवसायामुळे होणार्या त्रासाविरोधात ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ या व्यापाऱ्यांच्या संघटनेने २६ फेब्रुवारी या दिवशी भारत बंद जाहीर केला आहे. या भारत बंदला सातारा जिल्हा व्यापारी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.
याविषयी २४ फेब्रुवारी या दिवशी सातारा व्यापारी संघटनेची बैठक घेण्यात आली. बैठकीत भारत बंदला एकमुखाने पाठिंबा दर्शवत २६ फेब्रुवारी या दिवशी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे ठरवण्यात आले. जिल्ह्यातील सर्व छोट्या-मोठ्या व्यापार्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन प्रतिसाद द्यावा आणि ग्राहकांनीही बंदला पाठिंबा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सातारा व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.