इराकमध्ये अमेरिकेच्या दूतावासाला लक्ष्य करून रॉकेटद्वारे आक्रमण : जीवितहानी नाही

बगदाद (इराक) – येथील ग्रीन झोनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासाला लक्ष्य करून ३ रॉकेटद्वारे आक्रमण करण्यात आले; मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामधील एक रॉकेट दूतावासाच्या परिसरात पडले होते. या आक्रमणात संपत्ती आणि काही वाहने यांची हानी झाली.

ग्रीन झोनमध्ये अनेक देशांचे दूतावास आहेत. इराकमध्ये अमेरिकेला लक्ष्य करत करण्यात आलेले हे एका आठवड्यातील तिसरे आक्रमण आहे. यापूर्वी इरबील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या रॉकेट आक्रमणात एक कंत्राटदार आणि काही स्थानिक नागरिक यांचा मृत्यू झाला होता, तर अमेरिकेच्या सुरक्षा आस्थापनासाठी काम करणारे कर्मचारी घायाळ झाले होते.