सज्ञानी तरुणीला स्वेच्छेने विवाह आणि धर्मांतर करण्याचा अधिकार ! – कोलकाता उच्च न्यायालय

मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांचा विवाह अन् धर्मांतर यांचे प्रकरण

विवाहाचे आमीष दाखवून हिंदु तरुणींना फसवून ‘लव्ह जिहाद’ हा प्रकार घडतो आहे, हे अनेक प्रकरणातून निष्पन्न झालेले आहे. तरी न्यायालयाने अशा प्रकरणांची गंभीर नोंद घेऊन ‘लव्ह जिहाद तर नाही ना’, असे पहावे, असे जनतेला वाटते !

कोलकाता (बंगाल) – सज्ञान असलेली तरुणी स्वतःच्या इच्छेने विवाह करण्यास आणि कुठलाही धर्म स्वीकारण्यास मुक्त आहे. तिच्या या निर्णयामध्ये न्यायालय कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही, असा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे.

पल्लबी सरकार ही १९ वर्षीय तरुणी १५ सप्टेंबर २०२० पासून बेपत्ता असल्याची याचिका तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. ७ डिसेंबर २०२० या दिवशी मूर्तिया पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पल्लबी हिने असमौल शेख नावाच्या तरुणाशी विवाह करून इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. पोलिसांनी पल्लबी हिचा जबाब नोंदवला. त्यात तिने ‘माझ्यावर विवाह करण्यासाठी आणि धर्म परिवर्तनासाठी कुठलीही सक्ती करण्यात आली नाही. तसेच वडिलांच्या घरी परतण्याची इच्छा नाही’, असे म्हटले आहे.