(म्हणे), ‘पुराणकथांनी पुरुषांना स्त्रियांवर अन्याय करायला शिकवले !’ – कथित लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची मुक्ताफळे

अंनिसच्या ट्रस्टमधील घोटाळ आणि भ्रष्टाचार यांवर बोलण्याचे धाडस डॉ. तारा भवाळकर दाखवतील का ? 

डॉ. तारा भवाळकर

विटा (जिल्हा सांगली) – जमदग्नि हा तापट ऋषि होता. बायकोच्या केवळ मनात परपुरुषाचा विचार आला; म्हणून त्याने त्याच्या मुलाला, आईचे मस्तक धडावेगळे करण्याचा आदेश दिला आणि मुलानेही तो तंतोतंत पाळला. अशा पुराणकथांनी पुरुषांना केवळ संशयावरून स्त्रीवर हात उचलण्याचे स्वातंत्र्य दिले, असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांनी केले. (एकीकडे पुराण, महाभारत, रामायण थोतांड आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच पुराणांमधील दाखले द्यायचे हा पुरो(अधो)गाम्यांचा दुतोंडीपणा आहे ! जरी भगवान परशुराम यांनी वडिलांच्या आज्ञेवरून मातेचा शिरच्छेद केला असला, तरी त्याच परशुरामांनी आईसाठी परत त्यांच्या वडिलांकडे जीवनदान मागितले होते. यानंतर भगवान परशुराम यांनी अन्य एका स्त्रीचे मस्तक स्वत: आणून जोडले होते, हे मात्र डॉ. भवाळकर या सोयीस्कररित्या सांगण्याचे टाळत आहेत. पुराणांवर बोलण्याच्या अगोदर डॉ. भवाळकर यांनी अंनिसच्या ‘ट्रस्ट’मध्ये काय घोटाळे आहेत ते पहावे आणि त्यावर बोलण्याचे धाडस दाखवावे ! – संपादक)

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वार्षिक अंकाच्या प्रकाशन समारंभामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अगदी प्रारंभी भूमीची मालकी महिलांकडे होती पुढे पुरुषांनी त्यांना भूमीवरून बेदखल केले. (प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत महिलांना पुरुषांइतकेच मानाचे स्थान होते आणि आहे. नंतरच्या यज्ञसंस्कृतीच्या काळातही पुरुषाइतकेच महिलेसही मानाचे स्थान होते. अगदी अलीकडच्या काळातही महिला राण्यांनी राज्य केल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे डॉ. भवाळकर यांनी तथ्यहीन बेछूट विधाने करू नयेत ! – संपादक) त्यानंतर कनिष्ठवर्गीय पुरुषांना वरिष्ठ वर्गीयांनी बेदखल केले आणि आता त्यांच्याही भूमी काढून घेण्यासाठी ‘कॉर्पोरेट सेक्टर’ पुढे आले आहे, डॉ. भवाळकर म्हणाल्या. (डॉ. भवाळकर यांचा जावईशोध ! – संपादक)