परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी करण्यात आलेल्या यागाचा आध्यात्मिक लाभ त्यांना न होता समष्टीला होण्यामागील कारण

श्री. राम होनप

‘वर्ष २०१९ मध्ये महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात एक याग करण्यात आला होता. यागाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. त्या वेळी जाणवलेले सूत्र पुढे देत आहे.

याग चालू असतांना त्यातून पांढर्‍या रंगाची ईश्‍वरी शक्ती निर्माण होत होती. ईश्‍वरी शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांच्या दिशेने न जाता वातावरणात सर्वत्र पसरून कार्य करतांना जाणवली. त्या वेळी माझ्या मनात प्रश्‍न आला, ‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठी याग चालू असतांना त्यातून येणारी शक्ती त्यांना न मिळता अन्यत्र का जात आहे ?’, त्याचे सूक्ष्मातून पुढील उत्तर मिळाले, ‘परात्पर गुरु डॉक्टर समष्टीशी एकरूप झालेले आहेत. जेव्हा भारतातील राष्ट्र आणि धर्म यांच्या बिघडलेल्या स्थितीत सुधारणा होईल, तेव्हाच परात्पर गुरु डॉक्टरांना होत असलेले शारीरिक त्रास दूर होऊन त्यांच्यावरील मृत्यूचे संकट टळणार आहे.’

–  श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.