मायेतून अलिप्त झालेल्या आणि अंतर्मनाची साधना चालू असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करणार्‍या रामनाथी आश्रमातील दिवंगत साधिका सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या साधिका सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी (वय ७५ वर्षे) यांचे २० एप्रिल २०२० या दिवशी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांचे पती ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी दोघेही आश्रमात राहून सेवा करतात. सौ. सुजाता कुलकर्णी यांनी आध्यात्मिक दोषाच्या निवारणार्थ कसे प्रयत्न केले ?’, हे आपण या लेखमालेतून पाहिले. ७ मे या दिवशी आपण श्री. कुलकर्णी आणि कु. तृप्ती यांची गुणवैशिष्ट्ये अन् सौ. सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूपूर्वी संतांनी घेतलेल्या भेटी याविषयी काही भाग पाहिला. आज आपण त्याचा पुढील भाग पाहूया.

(भाग १२)

सौ. सुजाता  कुलकर्णी

७. सौ. सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूपूर्वी संतांनी घेतलेल्या भेटी

७ आ. सौ. कुलकर्णी यांना आपल्या चैतन्यमय बोलांनी आश्‍वस्त करणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि भावोत्कट हुंकार अन् हावभाव यांद्वारे त्यांच्याशी ‘शब्दाविण संवाद’ साधणार्‍या सौ. कुलकर्णी !

७ आ ३. सद्गुरु बिंदाताई यांनी काकूंना स्पर्श करणे आणि ‘तुम्ही सूक्ष्मातून जे बोलता, ते देव लक्षात आणून देत असल्याने आता शब्दांची आवश्यकता नाही’, असे सांगणे

सद्गुरु बिंदाताई (काकूंना स्पर्श करून) : तुम्हाला माझा स्पर्श जाणवतो का ? तुम्हाला स्पर्श करून छान वाटले. हाताला स्पर्श जाणवतो का ? मस्तकावर जाणवतो का ?

(काकूंनी डोळ्यांची उघड-झाप करून प्रतिसाद दिला.)

सद्गुरु बिंदाताई : तुमचा स्पर्श किती चांगला वाटतो. गालाला स्पर्श जाणवतो का ? (काकूंनी मान डोलावली.) तुम्हाला आज्ञाचक्रावर आणि मस्तकावर संवेदना जाणवतात ना ! तुम्हाला सगळे समजते की ! केवळ बोलता येत नाही. तुम्ही सूक्ष्मातून जे बोलता, ते देव माझ्या लक्षात आणून देत आहे. आता शब्दांची आवश्यकता नाही.

कुलकर्णीकाकू : हं

कु. तृप्ती कुलकर्णी

७ आ ४. ‘सौ. कुलकर्णी यांचे ‘भगवंत आणि त्या’ एवढेच सुंदर विश्‍व आहे’, असे सद्गुरु बिंदाताई यांनी सांगणे

सद्गुरु बिंदाताई (श्री. देवदत्त कुलकर्णी आणि कु. तृप्ती यांना उद्देशून) : त्यांना सहस्रार आणि आज्ञा या चक्रांवर, तसेच हात अन् गाल यांवर स्पर्श जाणवला. ‘‘नाम चालू आहे का ?’’, असे विचारल्यावर ‘‘नाम चालू आहे’’, असे त्या म्हणाल्या. त्या अखंड देवाच्या अनुसंधानात आहेत. ‘भगवंत आणि त्या’, एवढेच त्यांचे सुंदर विश्‍व आहे. सगळी गुरुदेवांची कृपा आहे.

७ आ ५. परात्पर गुरु डॉक्टरांना लेख आवडल्याचे सांगितल्यावर सौ. कुलकर्णी यांनी मान डोलावून प्रतिसाद देणे

सद्गुरु बिंदाताई : तुम्हाला भेटून मला पुष्कळ आनंद झाला. (काकूंनी डोळे उघडले.) परात्पर गुरुदेव तुमच्या लिखाणाचे कौतुक करत होते. ‘तुम्ही किती सुंदर लिखाण करता !’, असे म्हणत होते. तुम्ही जे लेख लिहिले होते ना, ते गुरुदेवांना पुष्कळ आवडले. त्यांनी आम्हालाही ते वाचायला सांगितले. (‘सौ. सुजाता कुलकर्णी यांनी तृप्तीला तिच्या लहानपणापासून झालेल्या त्रासाचे लिखाण केले होते.’ – संकलक) 

(काकूंनी मान डोलावून प्रतिसाद दिला.)

७ आ ६. ‘अत्यवस्थ स्थितीतही काकूंची सद्गुरु बिंदाताईंना नमस्कार करण्याची तळमळ पाहून ‘तुमचा नमस्कार मला सूक्ष्मातून पोचला, मीच तुम्हाला नमस्कार करते’, असे सांगून त्यांचा भावपूर्ण निरोप घेणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

श्री. देवदत्त कुलकर्णी (सौ. कुलकर्णी यांना उद्देशून) : काहीतरी बोल !

सद्गुरु बिंदाताई : त्यांना बोलायला येत नसले, तरी त्यांची भाषा मला सूक्ष्मातून समजली. त्यांच्या तोंडवळ्यावरील हावभाव, त्यांचे मान हलवणे, यांद्वारे त्यांनी न बोलताही सर्व उत्तरे दिली आहेत. काकू, छान वाटले. मी परत येईन हं तुम्हाला भेटायला.

(काकूंनी एक हात हलवला.)

सद्गुरु बिंदाताई (काकूंचा हात हातात घेऊन) : काकू, काही सांगायचे आहे का ? हात का हलवला ? तुमचा हात देवाने पकडला आहे. कुलकर्णीकाका आणि तृप्ती यांना काही सांगायचे आहे का ?

श्री. देवदत्त कुलकर्णी : बोल ना ! तुला काय पाहिजे ? काही नको ?

सद्गुरु बिंदाताई : काकू, काही बोलायचे आहे का ? हात का वर घेतला ? नमस्कार करायचा होता का ? (‘या वेळी ‘त्यांना नमस्कार करायचा आहे’, असे मला आतून जाणवले.’ – सद्गुरु बिंदाताई)

(काकूंनी होकारार्थी मान डोलावली.)

सद्गुरु बिंदाताई : मला असे आतून जाणवले की, तुम्हाला नमस्कार करायचा आहे. काकू, मीच तुम्हाला नमस्कार करते. तुमचा नमस्कार मला सूक्ष्मातून पोचला.

सद्गुरु बिंदाताई (साधकांना उद्देशून) : त्या एरव्ही हात हलवायच्या का ?

कु. तृप्ती : नाही. काल रात्रीपासून हात हलवत नाही.

सद्गुरु बिंदातार्ई : नामजपातून चैतन्य मिळेल हं काकू. नामजप चालू ठेवा. परत भेटायला येते हं !

७ इ. स्वतःची प्राणशक्ती न्यून असतांनाही दीर्घकाळ रुग्णशय्येवर असलेल्या सौ. कुलकर्णी यांना ‘तुम्ही मायेतून सुटलात’, असे सांगून त्यांना अत्यवस्थ स्थितीतही आनंद देणारे परात्पर गुरु डॉक्टर !

रामनाथी आश्रमातील सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी या साधिका रुग्णाईत असतांना १९.४.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉक्टर स्वत:ची प्राणशक्ती अल्प असतांनाही ‘लिफ्ट’ने त्यांना भेटायला गेले होते. त्या वेळी तेथे सौ. कुलकर्णीकाकूंचे यजमान श्री. देवदत्त कुलकर्णी, त्यांची मुलगी तृप्ती, तसेच साधिका सौ. अरुणा तावडे उपस्थित होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचे साधकांशी झालेले संभाषण पुढे देत आहे.

७ इ १. परात्पर गुरु डॉक्टरांनी कुलकर्णीकाकूंनी लिहिलेल्या लेखाचे कौतुक करून ‘त्यातून तुमची साधना झाली’, असे सांगणे

परात्पर गुरु डॉक्टर : तुम्ही दत्ताचा नामजप करता ना ? ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना बरे वाटते ना ?

सौ. कुलकर्णीकाकू : हो.

परात्पर गुरु डॉक्टर : नामजप अखंड करायचा. अलीकडे २ – ३ मासांपूर्वी तुम्ही तृप्तीविषयी फारच छान लेख लिहिला होता. ‘ती लहान होती, शाळेत जात होती. तेव्हा ‘तिला कसे त्रास व्हायचे ?’ तुम्ही रात्रंदिवस जागून तिची कशी काळजी घेतली ?’, याविषयी तुम्ही लेखात लिहिले आहे. तुमची तीच मोठी साधना झाली आणि काय पाहिजे ?

७ इ २. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीमुळे ‘मला आनंद मिळाला’, असे सौ. कुलकर्णीकाकूंनी म्हटल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘मलाही पुष्कळ आनंद झाला’, असे सांगून ‘आता सारखा नामजपच करायचा’, असे सांगणे

परात्पर गुरु डॉक्टर : आता थोडे शब्द बोलले, तरी दम लागतो का ? मलाही दम लागतो. मीही तुमच्यासारखाच आहे. तुमचे वय किती आहे ?

सौ. कुलकर्णीकाकू : ७५ वर्षे

परात्पर गुरु डॉक्टर : तुमचे वय ७५ आणि माझे ७७ वर्षे ! आपण एका ‘पार्टीतले’च नाही का ? तृप्तीच्या बाबांची सेवा फार छान चालली आहे हं ! ते पुढे चालले आहेत.

सौ. कुलकर्णीकाकू : आपली कृपा !

परात्पर गुरु डॉक्टर : तुम्हाला ‘आपली कृपा’ हेच शब्द माहिती आहेत. अजून काहीतरी बोला ना ! मला चालता येत नाही, तरी आज तुम्हाला भेटायचेच; म्हणून मी आलो.

सौ. कुलकर्णीकाकू : मला आनंद मिळाला.

परात्पर गुरु डॉक्टर : मलाही पुष्कळ आनंद झाला. ‘आपली जुनी साधिका येथपर्यंत आली आणि तिची शारीरिक स्थिती अशी असतांनाही तिचा नामजप चालू आहे’, हे फार छान आहे ना ! आता कुणाशी अधिक बोलत नाही ना ? सारखा नामजपच करायचा.

७ इ ३. सौ. कुलकर्णीकाकूंनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘पिताजी’ म्हणून संबोधून ‘त्यांची कृपादृष्टी सतत असावी’, असे म्हणणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘तुम्ही मायेतून सुटलात’, असे सांगून त्यांना केवळ देवाशी अनुसंधान ठेवण्यास सांगणे

कु. तृप्ती : आई, तुला भेटायला कोण आले आहे ?

सौ. कुलकर्णीकाकू : माझे पिताजी !

कु. तृप्ती (हसून) : आज नवीन नाव ? नेहमी तू त्यांना ‘प.पू. (परात्पर गुरु डॉक्टर)’ म्हणतेस ना ?  मग आज ‘पिताजी’ कसे काय म्हणालीस ?

सौ. कुलकर्णीकाकू : आज तसे तोंडातून आले.

कु. तृप्ती : तुला काही सांगायचे आहे का त्यांना ?

सौ. कुलकर्णीकाकू (परात्पर गुरु डॉक्टरांना) : तुमची कृपादृष्टी सतत असावी !

परात्पर गुरु डॉक्टर : देवाची कृपादृष्टी तुमच्यावर आहेच. अशा रुग्णाईत स्थितीतही एवढी साधना करणारे कुणी पाहिले नाही मी अजून ! तुमचाच पहिला क्रमांक ! आता मागची-पुढची काही काळजी नाही ना ? सुटलात एकदा मायेतून. आता केवळ देवाशी अनुसंधान ठेवायचे !

७ इ ४. सौ. कुलकर्णीकाकूंनी तृप्तीला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण केले असल्यामुळे त्यांना तिची कसलीच काळजी वाटत नसल्याचे सांगणे

सौ. अरुणा तावडे : काकू, परात्पर गुरु डॉक्टर तुम्हाला भेटायला आले. आता शक्ती मिळाली ना ?

सौ. कुलकर्णीकाकू : हो. तेच शक्ती देणार आहेत.

सौ. अरुणा तावडे : तृप्तीची काळजी वाटत नाही ना ?

सौ. कुलकर्णीकाकू : अजिबात वाटत नाही ! ईश्‍वर आहे ना ?

परात्पर गुरु डॉक्टर : किती सुंदर उत्तर आहे ! तुम्ही तिघांनीही चांगली साधना करून आम्हाला फार आनंद दिला आहे आणि काय पाहिजे ?

सौ. कुलकर्णीकाकू : कुणाला माहिती कशी साधना केली ते ?

परात्पर गुरु डॉक्टर : मला माहिती आहे ना ! तुम्ही तुमचे मन लपवून ठेवणार आहात का ?

७ इ ५. परात्पर गुरु डॉक्टरांनी कुलकर्णीकाकूंना ‘नामजपच करा, तोच महत्त्वाचा आहे’, असे सांगून ‘काकू रुग्णाईत असतांनाही त्यांचा तोंडवळा चांगला दिसत आहे’, असे सांगणे

कु. तृप्ती : आई, तू नेहमी मला म्हणायचीस ना, ‘मला प.पू. (परात्पर गुरु डॉक्टर आठवले) भेटल्यावर ‘मी हे सांगेन, ते सांगेन.’ आता ते तुला भेटायला आले आहेत. त्यांच्याशी बोल.

परात्पर गुरु डॉक्टर : नको. माझ्याशी बोलायला नको. नामजप करत आहात ना ? मग नामजपच करा. ‘नामजप करणे’ म्हणजे देवाशीच बोलणे आहे. ते अधिक महत्त्वाचे आहे ना ?

सौ. कुलकर्णीकाकू : सगळाच आनंद आहे. देव आला की, आनंद होतो.

परात्पर गुरु डॉक्टर : तुम्हाला पाहून मलाही आनंद झाला. तृप्ती मला सांगायची, ‘‘आई रुग्णाईत आहे.’’ तृप्तीचे बाबाही ‘‘तुम्ही रुग्णाईत आहात’’, असे सांगायचे; पण तुम्हाला पाहून ‘तुम्ही रुग्णाईत आहात’, असे वाटतच नाही.

७ इ ६. परात्पर गुरु डॉक्टर निघाल्यावर ‘हात मिळवणी झाली’, असे म्हणून सौ. कुलकर्णीकाकूंनी दोन्ही हात जोडून नमस्कार करणे आणि रुग्णाईत झाल्यापासून हात न हलवणार्‍या काकूंनी हात जोडून नमस्कार केल्याने आश्‍चर्य वाटणे

परात्पर गुरु डॉक्टर : काकू, आता मी येतो. परत भेटू.

सौ. कुलकर्णीकाकू : हात मिळवणी झाली. (‘म्हणजे देवाने पुढच्या प्रवासासाठी त्यांचा हात धरला आहे.’ – संकलक)

परात्पर गुरु डॉक्टर : हो, हात मिळवणी झाली.

कुलकर्णीकाका : रुग्णाईत असल्यापासून तिने पहिल्यांदाच नमस्कार केला तुम्हाला. एरवी ती हातही हलवू शकत नाही. आज तिने पहिल्यांदाच नमस्कार केला.

परात्पर गुरु डॉक्टर : त्यांचा तोंडवळा पूर्वीसारखा दिसतो. त्यांच्या तोंडवळ्याकडे पहातच रहावेसे वाटत आहे, इतका तो छान आहे.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक