परात्पर गुरुदेवांच्या चरणी किती मानावी कृतज्ञता ।

साधकांची प्रज्ञा जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सूत्रसंचालन करणार्‍या साधकांमध्ये जाणवत होता शून्य अहंकार ।
परात्पर गुरुदेव वाटत होते, स्वयं श्रीविष्णूचा अवतार ॥ १ ॥

सद्गुरु (सौ.) अंजलीताई आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई ।
दिसत होत्या श्री महालक्ष्मीचे रूप साकार ।
बासरीवादनाने होत होता श्रीकृष्णलोकाचा साक्षात्कार ॥ २ ॥

जेव्हा छेडली गेली सतार, तेव्हा मंत्रमुग्ध झाले ।
सगळीकडे दुमदुमू लागला, श्रीकृष्णाचा जयजयकार ॥ ३ ॥

गायनात भावपूर्ण शब्दरूपी पुष्पांनी गुंफत होते हार ।
नृत्याने शिकविला समर्पणाचा स्वीकार ॥ ४ ॥

परात्पर गुरुदेवांनी घडवले आहेत दैवी कलाकार ।
चैतन्यामुळे होत होता काळ्या शक्तीचा लय ॥ ५ ॥

परात्पर गुरुदेवांच्या चरणी किती मानावी कृतज्ञता ।
आणि किती मानावे आभार ॥ ६ ॥

(११.१२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विष्णुतत्त्व जागृती सोहळा’ पाहून श्रीकृष्णाच्या कृपेने सुचलेली कविता)

– सौ. उर्मिला सारडा, विश्रामबाग, सांगली. (२३.१२.२०१९)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक