अनावश्यक फिरणार्‍यांच्या ५० हून अधिक दुचाकी पोलिसांकडून कह्यात

सातारा, २६ मार्च (वार्ता.) – शहरातून विनाकारण कुणीही दुचाकीवरून फिरतांना आढळल्यास संबंधितांची दुचाकी शासनाधीन करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे. आतापर्यंत ५० हून अधिक दुचाकी पोलीस प्रशासनाने कह्यात घेतल्या असून ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच या दुचाकी मालकांना मिळतील, असे समजते.