आषाढी वारीला जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना पथकर माफी !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांचा पथकर रहित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘ट्वीट’द्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

वारकर्‍यांनी वाहनांवर ‘स्टिकर्स’ लावण्याच्या, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस यांकडे नोंदणी करण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे.