पुणे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; १६२ दुचाकी जप्त !

येथे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणार्‍या टोळीला पकडण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी चोरांकडून ५५ लाख रुपयांच्या १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपालिकेकडून पाण्याची चोरी रोखण्यासाठी फिरत्या पथकाची नियुक्ती

पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीची चोरी होते, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचे परिणाम ! समाजाला धर्मशिक्षण दिले, तर त्यांच्यात आपसूकच नैतिकता निर्माण होते, हे लक्षात घेऊन शासनाचे लोकांना धर्मशिक्षण द्यावे !

नाशिक येथील सिद्धिविनायक मंदिरात गणेशमूर्तीच्या दागिने चोरणार्‍याला अटक !

मशिदी किंवा चर्च येथे कधी चोरी झाल्याचे ऐकिवात आहे का ?

पुणे येथे ५० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांवर गुन्हा नोंद !

चोरी झालेली ‘इर्टिगा’ गाडी परत मिळवून देण्याकरता केलेल्या साहाय्याचा मोबदला म्हणून ५० सहस्र रुपयांची लाचेची मागणी करणारे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवार हे सिंहगड रस्ता पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत.

जोतिबा यात्रेच्या (जिल्हा कोल्हापूर) काळात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त !

जोतिबा देवाच्या यात्रेच्या काळात जोतिबा डोंगर, तसेच कोल्हापूर बसस्थानक येथे झालेल्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त झाले आहेत. जोतिबाच्या डोंगरावर गळ्यातील साखळी, मंगळसूत्र चोरून नेणे, खिशातील पाकीट चोरून नेणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पुणे येथील नरपतगिरी चौकातील साईबाबा मंदिरातून दानपेटीची चोरी !

उत्सवांच्या दिवशी मंदिरांमध्ये चोरी होणे, हे हिंदूंची मंदिरे असुरक्षित असल्याचे द्योतक !

सातारा येथे एका संप्रदायाच्या सत्संग कार्यक्रमात लाखो रुपयांची चोरी !

जिल्हा परिषदेच्या मैदानावर १४ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका संप्रदायाच्या सत्संग कार्यक्रमात चोरांनी ५ लाख ९१ सहस्र ५०० रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

चिंचवड (पुणे) रेल्वे स्थानकाजवळील आनंदनगरमधील १ सहस्र ४०० घरगुती वीजचोर्‍या उघड !

एवढ्या अवैध वीजजोडण्या होईपर्यंत महावितरणचे अधिकारी झोपले होते का ?

पुणे येथे चोरीप्रकरणी आयटी अभियंता तरुणी अटकेत !

उच्‍च शिक्षण घेऊनही संस्‍कार नसणे, हे मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचे अपयशच आहे. मुलांवर शाळेतूनच संस्‍कार होण्‍यासाठी त्‍यांना धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

पेण येथे लक्‍झरीमधील प्रवाशांना मारहाण करत १५ तोळे सोने लुटले

येथून बोरीवली येथे जाणार्‍या लक्‍झरी बसमधील प्रवाशांना पेण तालुक्‍यातील कोपर फाटा येथे मारहाण करत त्‍यांच्‍याकडून १५ तोळे सोने लुटल्‍याची घटना १२ मार्चला उत्तररात्री ३ वाजता घडली आहे.