पुणे येथे चोरीप्रकरणी आयटी अभियंता तरुणी अटकेत !

पुणे – फिनिक्‍स मार्केट सिटी येथील ‘ब्‍लू स्‍टोन’ या दागिन्‍यांच्‍या दुकानातून आयटी अभियंता असलेल्‍या तरुणीने २ लाख ८२ सहस्र रुपयांच्‍या ‘ब्रेसलेट’ची चोरी केली. पोलिसांनी अधिक अन्‍वेषण केले असता १ वर्षापूर्वीही असाच गुन्‍हा केल्‍याचे तिने सांगितले. ‘मला दागिना आवडला; म्‍हणून मी तो चोरला’, असे उत्तर तिने पोलिसांना दिले. ही तरुणी मूळची देहली येथील असून नोकरीनिमित्त वडगाव शेरी येथे रहाते. तरुणीने दागिने खरेदीच्‍या बहाण्‍याने ‘ब्रेसलेट’ चोरले. पोलीस अंमलदार वैशाली माकडी आणि निरीक्षक गणेश माने अन् त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी शोध घेऊन तरुणीला कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका

  • आयटी अभियंता तरुणीने चोरी करणे हे महासत्ता होऊ पहाणार्‍या भारतासाठी लज्‍जास्‍पद ! 
  • उच्‍च शिक्षण घेऊनही संस्‍कार नसणे, हे मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचे अपयशच आहे. मुलांवर शाळेतूनच संस्‍कार होण्‍यासाठी त्‍यांना धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !