पुणे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; १६२ दुचाकी जप्त !

दुचाकी चोरणार्‍या टोळीला पकडण्यात आले

पुणे – येथे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणार्‍या टोळीला पकडण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी चोरांकडून ५५ लाख रुपयांच्या १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी १७ आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला कह्यात घेतले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली. गुन्हे शाखेने २००८ नंतर दुचाकी चोरांविरुद्ध केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

संपादकीय भूमिका

इतक्या गाड्यांची चोरी होईपर्यंत पोलीस प्रशासन झोपले होते का ?