जिहाद्यांचे क्रौर्य आणि हिंदूंचा आक्रोश : ‘द कश्मीर फाइल्स’

कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असतांना पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे कूचकामी का ठरली ? हिंदू स्वतःचे रक्षण का करू शकले नाहीत ? काश्मीरमधील तत्कालीन सरकारने या वंशविच्छेदाला कसे साहाय्य केले ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ !

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला केला जाणारा विरोध म्हणजे हिंदूंवरील दबावतंत्रच ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, लेखक आणि व्याख्याते

काश्मिरी पंडितांवर प्रचंड अत्याचार होऊनही एकाही पंडिताने शस्त्र उचलले नाही किंवा एकही जण अतिरेकी झाला नाही. हिंदूंच्या सहिष्णुतेचे हे मोठे उदाहरण आहे. आपल्याच देशातील लोकांना आपले घरदार सोडून दुसर्‍या भागात बळजोरीने स्थायिक व्हावे लागणे, हे लज्जास्पद आहे.

हिंदूंच्या वंशविच्छेदाचे दडपलेले सत्य !

जगातील एकाही देशात आतंकवादाचे उदात्तीकरण होत नाही; पण भारतात मात्र ते सर्रासपणे होते. तेव्हा कुणीही अशा चित्रपटांना विरोध करत नाही. मग काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारलेल्या या चित्रपटालाच विरोध का ? हा दडपलेला इतिहास जगासमोर का येऊ दिला जात नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातच आहेत !

EXCLUSIVE : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या घोर यातना जगाला समजणे अत्यावश्यक !

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून या अत्याचारांना जागतिक पटलावर ठेवण्याचा दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा हा धाडसी प्रयत्न ! त्याला प्रसारमाध्यमांकडून अपेक्षित प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या भारताचे दुर्दैवच !

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यास ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचे कपिल शर्मा यांचा नकार !

काश्मिरी हिंदूंचे धक्कादायक वास्तव उघड करणार्‍या चित्रपटाची प्रसिद्धी कुणीही करणार नाही, हे लक्षात घेऊन राष्ट्रप्रेमी भारतियांनीच यासाठी पुढाकार घ्यावा !

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे विज्ञापन (ट्रेलर) प्रदर्शित !

काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद होऊन ३० वर्षे झाल्यानंतर चित्रपट बनवला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंवर झालेले अशा प्रकारचे अत्याचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यास निष्क्रीय रहाणार्‍या हिंदूंवर सातत्याने धर्मांध आक्रमण करत असतील, तर त्याच आश्‍चर्य ते काय ?