नवीन पालिका वटहुकूमाला अखिल गोवा व्यापारी संघटनेचा विरोध : ७ जानेवारीला दुकाने ‘बंद’ ठेवण्याची हाक

अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या म्हापसा येथील सत्यहिरा सभागृहात ३ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत ‘गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश २०२०’ या शासनाने काढलेल्या वटहुकूमाला विरोध दर्शवला आहे.

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही विरोध

काँग्रेसने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्यास ठाम विरोध केला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणावरून शिवसेना आणि काँग्रेस या २ पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही. औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील.

औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असणे, हा शिवरायांचा अपमान ! – शिवसेना

जे निजामी अवलादीचे आहेत, ते औरंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे.

‘कोल्हापूर अर्बन’ संचालकांच्या कुलुमनाली दौर्‍यातील २ लाख ४६ सहस्र रुपयांच्या प्रवास व्ययाच्या चौकशीचे आदेश

‘कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँके’च्या ६ संचालक प्रशिक्षणासाठी कुलुमनाली दौर्‍यावर गेले असता २ लाख ४६ सहस्र रुपये व्यय आला आहे. याविषयी चौकशी करून १५ दिवसांत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिले आहेत.

देशभरातील पुरोगामी संघटनांची संयुक्त शिखर समिती स्थापन

पुरोगामी चळवळीत काम करणार्‍या विविध संघटनांची ‘जिल्हा सेवा समिती’ नावाने शिखर संघटना स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत हा निर्णय झाला.

प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात

वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे.

गोव्यात जानेवारीत कोरोनाचा संसर्ग वाढणार ! – आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांची चेतावणी

राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून पर्यटकांच्या मेजवान्या कोणी होऊ दिल्या ? पोलीस आणि प्रशासन यांनी या पर्यटकांकडून कोरोनाविषयीच्या नियमावलीचे पालन का करून घेतले नाही ?

विरोध डावलून शासन मेळावली (सत्तरी) येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार

गोवा शासन स्थानिकांचा विरोध डावलून मेळावली, सत्तरी येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ जानेवारी या दिवशी ‘आयआयटी’च्या पदाधिकार्‍यांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले होते.

इंग्लंडहून गोव्यात आलेल्या १२ कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून नकारात्मक

इंग्लंडहून गोव्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून तपासणीसाठी पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यामधील १२ रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून नकारात्मक आले आहेत, तर इतर नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाचे उद्घाटन जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात होणार

चिपी-परूळे येथे साकारात असलेल्या सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. २० जानेवारीनंतर प्रत्यक्ष प्रवासी आरक्षण चालू होणार आहे.