‘राम कर्ता आहे’ ही परमार्थातील पहिली पायरी !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

‘मी कोणत्याही परिस्थितीत राहीन’, असे जो म्हणेल, त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना न्यून लेखू नये. अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय ? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. ‘प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे’, ही संपत्तीची समान वाटणी होय. मोबदला न देता आपण पैसा घेतला, तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते. ‘मी कर्ता आहे’, ही प्रपंचातील पहिली पायरी, तर ‘राम कर्ता आहे’, ही परमार्थातील पहिली पायरी !

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. प्रा. के.व्ही. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)