तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे, यापलीकडे सत्य सांगतो. मला कसलीही अपेक्षा नाही. नाम हे सर्व साधनांत स्वाक्षरीसारखे आहे. हुकूम कितीही कडक असेना का; परंतु त्याच्याखाली जर स्वाक्षरी नसेल, तर त्या हुकुमाला महत्त्व नाही. साहेबाच्या स्वाक्षरीच्या कागदाला महत्त्व आहे. परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे, हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे, तिथे संतांचा सहवास आहे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)