मोठे झाड तोडायचे असेल, तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो, त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या, म्हणजे आपले हवे-नकोपण आधी तोडावे आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे, ते भगवंताजवळच मागावे. त्याने ते नाही दिले, तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे, अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच वासना मरेल आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत्स्वरूप होईल. जो जिवंतपणी वासनारहित राहिला, त्याला सुख-दु:ख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे रहाण्याने वासना क्षीण होईल.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)