समाधान केव्हा मिळते ?

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते, तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरिरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा. ‘भोग प्रारब्धाने येतात’, असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात’, असे म्हटले की, समाधान मिळेल. भगवंताला स्मरून काम करत असतांना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे, असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)