विकारांना बाहेर न येण्यासाठी नामाची जागृती सातत्याने हवी !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे आणि प्रेमळ आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो, तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल; परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहं, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही. कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही ? परंतु मध्येच हे विकार आड येतात. खरोखर भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या हृदयात नाम सतत जागृत ठेवा. आपण नामाची जागृती ठेवली, तर विकारांना बाहेर पडता येणार नाही.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून)