शिवाची नावे, त्यांचा अर्थ आणि शिवाचे कार्य
‘शिव म्हणजे कल्याण करणारा, शुभंकर. तो सर्व सृष्टीचा लयकर्ताही समजला जातो.
‘शिव म्हणजे कल्याण करणारा, शुभंकर. तो सर्व सृष्टीचा लयकर्ताही समजला जातो.
जीव तपसाधनेने अग्नितत्त्व, यम, वरुण आणि वायुतत्त्व यांना ओलांडून मृत्युंजय अशा शिवतत्त्वाजवळ येतो. त्या वेळी शिव त्या जिवाला अभय देऊन र्ईश्वरी तत्त्वाच्या स्वाधीन करतो. त्या वेळी जीव आणि शिव एक होतात.
देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !
शिवाच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही शिवभक्तांसाठी काळानुसार समष्टी साधना आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे ? महाशिवरात्रीला शिवतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात ? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.
सहस्रो वर्षांपूर्वी हल्लीच्या सॅटेलाईटसारखे (उपग्रहासारखे) कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतांना या मंदिरांची अशा प्रकारे रचना असणे, हा खरोखरच भारतातील प्राचीन वास्तूकलेचा अद्भूत नमुना म्हणावा लागेल.
शिवाला निशिगंधाची फुले अथवा श्वेत रंगाची फुले वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.