इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ भावपूर्णरित्या साजरा !

११ जुलै या दिवशी ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सवा’च्या अंतर्गत सकाळी प.पू. अच्युतानंद महाराज (प.पू. भाऊ बिडवई) यांचे नामदेव पायरीचे भजन झाले. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प.पू. अच्युतानंद महाराज रचित हिंदी आणि मराठी भजनांचा कार्यक्रम झाला.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्यदायी भजनांची अवर्णनीय वैशिष्ट्ये !

प.पू. बाबांच्या भजनात नादब्रह्माची गुणातीत निर्गुण शक्ती दडलेली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या ‘विशेष भक्तीसत्संगा’च्या वेळी साधकांना आलेली गुरुतत्त्वाच्या अवतरणाची प्रचीती !

१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. ७ जुलै २०२२ या दिवशी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव असतो. या निमित्ताने ७.७.२०२२ या दिवशी झालेल्या विशेष भक्तीसत्संगात आलेल्या दैवी अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना प्रत्यक्ष गुरुतत्त्वाच्या अस्तित्वाची प्रचीती आली.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’ यांच्या वतीने ११ ते १३ जुलै या कालावधीत ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन करण्यात आले आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव साजरा

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी असलेला जन्मोत्सव येथील ‘भक्तवात्सल्याश्रमा’त भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला.

श्री. लोकेश (राजू) निरगुडकर यांना प.पू. भक्तराज महाराज यांचे पूर्ण लक्ष असल्याची आलेली अनुभूती

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त प.पू. बाबांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांच्याविषयी साधिकेचा दाटून आलेला भाव !

एकदा मला प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या ग्रंथाच्या संदर्भातील सेवेची संधी मिळाली. त्या वेळी प.पू. बाबांविषयी लिखाण वाचतांना माझे मन ओलेचिंब झाले. यापूर्वी कधी मी असा भावाचा ओलावा अनुभवला नव्हता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुपौर्णिमेला साधकांना समर्थ रामदासस्वामी यांच्या दोन सुवचनांतून आश्वस्त करणे

वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांना गुरुपौर्णिमेसाठी २ सुवचने लिहून आणायला सांगितली होती. एकदा अकस्मात् मला ही दोन्ही सुवचने आठवली.

भगवंताचे भावपूर्ण अनुसंधान साधून देणारे नाम !

दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणाऱ्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग !

अमृत आणि विष

अमृत प्यायलेल्यालासुद्धा ‘जहर’ म्हणजे विष घेतले, तर ‘आपण मरू कि काय’, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.