परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उच्चतम आध्यात्मिक अवस्थेमागील विवेचन आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

जगाला अध्यात्माची माहिती नसल्यामुळे त्यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे केवळ संत आहेत’, असे वाटते. याउलट सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक त्यांना मिळणाऱ्या ज्ञानातून आणि सप्तर्षी नाडीपट्टीच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘श्रीविष्णूचा अंशावतार’, अशा प्रकारे करतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बंगाल आणि आसाम या राज्यांतील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विद्युत् पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पंखे चालू नव्हते.

‘प.पू भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचा भावार्थ (भाग २)’ या ग्रंथाविषयी मनोगत

प.पू. भक्तराज महाराज यांच्या बऱ्याच भजनांचे अर्थ अनेकांना पूर्णपणे आकलन होत नाहीत. अर्थ समजून घेऊन भजने म्हटली किंवा ऐकली, तर भजने म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच भावजागृतीही लवकर होते. या दृष्टीने ही ग्रंथमालिका अतिशय उपयुक्त आहे.

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग- २)’ या ग्रंथाचे प्रकाशन !

या प्रसंगी प.पू. भक्तराज महाराजांच्या पत्नी प.पू. जीजी, पुत्र पू. नंदूदादा कसरेकर आणि भक्त श्री. शशीकांत ठुसेकाका यांच्या हस्ते ‘प.पू भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग- २)’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी आणि त्यांना साहाय्य त्यांची कन्या सौ. उल्का नितीन बगवाडकर यांनी केले आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेळगाव येथील चि. अविर प्रतीक कागवाड (वय १ वर्ष) !

वैशाख शुक्ल द्वितीया (२.५.२०२२) या दिवशी चि. अविर प्रतीक कागवाड याचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्त अविरच्या आजीला (वडिलांच्या आईला) त्याच्या जन्मापूर्वी आणि आजी-आजोबांना (वडिलांच्या आई-वडिलांना) त्याच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सौ. सुनंदा नंदकुमार जाधव यांना प.पू. भक्तराज महाराज आणि शिष्य डॉ. आठवले यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

यज्ञाच्या दिवशी एका साधिकेने मला आग्रह केला; म्हणून मी आरतीला गेले. पायर्‍यांवरून ध्यानमंदिरात जातांना मला चांगले वाटत होते. आरती चालू झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टर तेथे आले आणि आरतीला उभे राहिले. तेव्हा मला त्यांच्या शरिराभोवती एक वलय दिसले.

परात्पर गुरुपदावर असूनही स्वतःला प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य संबोधून सतत शिष्यभावात रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टर सतत शिष्यभावात असतात. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात सनातनची गुरुपरंपरा दर्शवणारी ५ छायाचित्रे लावली आहेत. त्यापैकी परात्पर गुरु डॉक्टर यांच्या छायाचित्राखाली ‘शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले’, असे लिहिले आहे.

प.पू. रामानंद महाराज यांनी वर्णिलेली प.पू. भक्तराज महाराज यांची महानता !

प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांनी ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी  भजनांतून गुरूंचे महत्त्व सांगणे, गुरूंप्रती दृढ विश्वास असणे’ आदींच्या माध्यमातून गुरूंची महानता वर्णिली आहे.