१. प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या ग्रंथासंबंधी सेवा करतांना भावस्थिती अनुभवणे
मी ग्रंथांच्या संदर्भातील सेवा करते. एकदा मला श्री. अशोक भांड यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी (प.पू. बाबांविषयी) लिहिलेल्या ग्रंथाच्या (ग्रंथ – श्री सद्गुरु महिमा खंड १ – श्री अनंतानंद साईश यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज) संदर्भातील सेवेची संधी मिळाली. त्या वेळी प.पू. बाबांविषयी लिखाण वाचतांना माझे मन ओलेचिंब झाले. यापूर्वी कधी मी असा भावाचा ओलावा अनुभवला नव्हता.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रमाणे सर्वच ठिकाणी सद्गुरूंचे चरण दिसण्यासाठी प्रार्थना होणे
‘प.पू. बाबांना सर्वत्र सद्गुरु (त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश) दिसायचे. ‘त्यांना शिवपिंडीमध्ये सद्गुरूंचे चरण दिसले आणि त्यांनी शिवपिंडीवर सद्गुरूंच्या पादुका ठेवल्या’, हे वाचल्यावर माझ्या डोळ्यांत नकळत भावाश्रू तरळले. त्या वेळी ‘हे गुरुदेवा, प.पू. बाबांप्रमाणे मला सर्व ठिकाणी तुमचे चरण केव्हा दिसतील ? माझ्या मनात तुमच्या चरणप्राप्तीची तीव्र तळमळ केव्हा निर्माण होईल ?’, असे मला वाटले.
‘हे गुरुदेवा, माझ्या मनाला नियंत्रित करायला मी असमर्थ आहे. तुमच्या इच्छेने कोणतीही कृती किंवा विचार करायला मी पुष्कळ अल्प पडते. गुरुराया, मला क्षमा करा. तुम्ही सर्व सामर्थ्यवान आणि जगत्नियंता आहात. तुम्हीच माझ्या मनात तुमच्या श्री चरणांच्या प्राप्तीची तीव्र तळमळ निर्माण करा आणि माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या. मला सर्वठायी आणि सर्वव्यापक अशा तुमच्या दैवी रूपाचे सदैव दर्शन होऊ दे.
– कु. मधुरा गोखले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१.१.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |