प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्यदायी भजनांची अवर्णनीय वैशिष्ट्ये !

प.पू. भक्तराज महाराज

१. प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांची भजने चित्त चैतन्याशी जोडणारी आहेत.

२. प.पू. बाबांच्या भजनातील सूक्ष्म-नाद हा सप्तपाताळातील वाईट शक्तींना भयकंपित करणारा आहे.

३. प.पू. बाबांच्या भजनात नादब्रह्माची गुणातीत निर्गुण शक्ती दडलेली आहे.

– एक विद्वान (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावाने भाष्य करतात.), २१.१२.२००५


१. अर्जुनाला जसा फक्त पक्ष्याचा डोळा दिसला, तसे फक्त आपले गुरु श्री साईश यांना नजरेसमोर ठेवून प.पू. बाबांनी भजने लिहली आहेत.

२. भजनांची भाषा अत्यंत सरळ आणि रसाळ आहे.

३. साधकाला उत्तेजन देणारी, खात्री देणारी, निराशा आणि न्यूनगंड झटकून टाकणारी भजने आहेत.

(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – प.पू. भक्तराज महाराज विरचित भजनामृत !)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.