इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन

‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन

इंदूर (मध्यप्रदेश) – ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’ यांच्या वतीने ११ ते १३ जुलै या कालावधीत ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ‘श्रीमद् सद्गुरु अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज या त्रिमूर्तींचा श्री गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा होणार आहे. या भावपूर्ण सोहळ्यामध्ये आप्तस्वकियांसह सहभागी व्हावे’, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

११ जुलै या दिवशीचे कार्यक्रम इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रम आश्रम येथे होणार आहेत, तर १२ आणि १३ जुलै या दिवशीचे कार्यक्रम इंदूर येथील नवनीत गार्डन, विज्ञाननगर (इंदूर आश्रमाच्या समोरील गल्लीमध्ये) येथे होणार आहेत.

विशेष

यंदाचे वर्ष हे प.पू. अच्युतानंद महाराज (श्री भाऊ बिडवई) यांचे शतकोत्तर जन्मशताब्दीचे वर्ष आहे. यानिमित्त या महोत्सवामध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘श्रीमद् सद्गुरु अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज

कार्यक्रमाची रूपरेषा

सोमवार, ११ जुलै २०२२

सकाळी ९.३० : श्रीस्तवन मंजिरी आणि श्री रामानंद बावनी पाठ
सकाळी १०.३० : प.पू. श्री अच्युतानंद यांच्या पायरीचे पूजन
सकाळी ११.३० : प.पू. श्री अच्युतानंद महाराज यांच्या स्वरचित मराठी आणि हिंदी भजनांचा कार्यक्रम
सायंकाळी ६.३० : श्रीगुरु संप्रदाय-निर्गुणी भजन आणि अभंगवाणी
रात्री ९ : आरती

मंगळवार, १२ जुलै २०२२

सकाळी ९ : श्रींच्या पादुकांची शोभायात्रा (भक्तवात्सल्याश्रम ते कार्यस्थळ)
सकाळी १०.३० : श्रीस्तवन मंजिरी आणि श्री रामानंद बावनी पाठ
दुपारी १२ : आरती
सायंकाळी ६.३० : भक्ती संगीताचा सुश्राव्य कार्यक्रम
रात्री १०.३० : प.पू. भक्तराज महाराज यांच्या स्वरचित भजनांचा कार्यक्रम

बुधवार, १३ जुलै २०२२

सकाळी ९ : श्री सत्यनारायण पूजन आणि श्री व्यास पूजन
सकाळी १० : श्रीस्तवन मंजिरी आणि श्री रामानंद बावनी पाठ
सकाळी ११ : श्रींच्या पादुकांवर अभिषेक आणि पूजन
दुपारी १ : महाप्रसाद