रक्षाबंधनाच्या निमित्ताने सांगली येथे विक्रेते आणि नागरिक यांचे भारतीय राख्यांना प्राधान्य !

गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश व्यापार्‍यांनी चिनी साहित्यावर बहिष्कार टाकला आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी शरद फडके यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन ! 

श्री. शरद फडके यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, प्रसंग, घटना या पुस्तिकेत शब्दबद्ध केल्या आहेत. या वेळी विनायक कुन्नूर, शरद फडके आणि प्रा. सचिन कानिटकर उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने धरणे आंदोलन !

सांगलीत महापुरानंतर नागरिक आणि व्यापारी यांना साहाय्यासाठी वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना दिलेले धान्य किडके आणि खराब आहे.

‘वसुधा फाऊंडेशन’ आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्याचे वाटप

वसुधा फाऊंडेशन आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर (जिल्हा सांगली) येथील स्व. सौ. मिनाताई ठाकरे कन्या प्रशाळा येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी !- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप

बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागाची संस्कृती आहे. या शर्यतीमुळे शेतकरी बैलांचे पालनपोषण करतो, त्यांना सकस आहार देतो, त्यांचा जीवापाड सांभाळ करतो. या बैलांमुळे खर्‍या अर्थाने गोवंश वाढतो;

सांगली जिल्ह्यात विविध प्रशासकीय कार्यालय, पोलीस विभाग, शिक्षण विभाग येथे निवेदन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !

जिल्हाधिकार्‍यांशी बोलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांचे ध्वज जप्त करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देऊ ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे यांनी १० ऑगस्ट या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात निवेदन दिले. याच मागणीचे निवेदन भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवकर यांनाही देण्यात आले.

महापूर ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी सांगली येथील ‘निर्धार फाऊंडेशन’चे अभूतपूर्व कार्य !

या कार्यकर्त्यांचा आदर्श सर्वच सामाजिक कार्य करणार्‍या संघटनांनी घ्यावा.

नागपंचमी सण साजरा करण्यासाठी नागांच्या प्रतिकात्मक प्रतिमांचे पूजन करावे ! – मौसमी चौगुले-बर्डे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी

प्रशासन नियमांचे पालन होण्यासाठी नेहमी हिंदूंच्या सणांसाठीच आग्रही दिसते; अन्य धर्मियांविषयी नाही. असे का ?

वसुधा फाऊंडेशन आणि शिवसेना सांगली शहर यांच्या वतीने सिद्धार्थनगर परिसरातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप !

या वेळी शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, शिवसेना माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे, वाहतूक सेनेचे माजी शहरप्रमुख ओंकार देशपांडे, तसेच अन्य उपस्थित होते.