प्रशासन नियमांचे पालन होण्यासाठी नेहमी हिंदूंच्या सणांसाठीच आग्रही दिसते; अन्य धर्मियांविषयी नाही. असे का ? – संपादक
सांगली, ५ ऑगस्ट – नागपंचमीला पूजा करण्यासाठी नागांना पकडू नका. नाग, साप पकडणे, त्यांची वाहतूक करणे, नागांची शिकार करणे अथवा नागांचे प्रदर्शन करणे यांवर कायद्याने बंदी आहे. नागपंचमी सणासाठी नागांचा वापर करणे यांसाठी न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे नागपंचमी सण साजरा करण्यासाठी नागांच्या प्रतिकात्मक प्रतिमांचे पूजन करावे, असे आवाहन प्रभारी अपर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘बैठक सभागृहात’ नागपंचमी सणाच्या आयोजनाविषयीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. (सहस्रो वर्षांची परंपरा असलेला नागपंचमी सण काही कथित पर्यावरणवाद्यांच्या दबावामुळे आज प्रतिकात्मक स्थितीत साजरा करावा लागत आहे ! हिंदू सोशिक-सहनशील असल्याने प्रशासन नेहमी हिंदूंवरच कायद्याचा बडगा उगारते, असे हिंदूंना वाटल्यास नवल ते काय ! – संपादक)
या वेळी अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, उपवनसंरक्षक विजय माने, शिराळाच्या नगराध्यक्षा सुनीता निकम, साहाय्यक वनरक्षक विजय गोसावी, शिराळा पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील उपस्थित होते.
प्रभारी अपर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, ‘‘नागपंचमी सण साजरा करतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, वन विभाग आणि महसूल विभाग यांनी समन्वयाने काम करावे. शिराळा परिसरात ‘ड्रोन’द्वारे निरीक्षण ठेवावे. ठिकठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्यात यावेत. जे कुणी कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी.’’ (रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीक्षेपक वाजवण्यास सर्वाेच्च न्यायालयाची मनाई आहे, तरी हे नियम मशिदीवरील भोंग्यांकडून सर्रास तोडले जातात. त्या वेळी कधी प्रशासन कारवाईचा बडगा उगारतांना दिसत नाही ! बकरी ईद, नाताळ या सणांच्या वेळी कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई झाल्याचे कधी ऐकिवात नाही ! हिंदूबहुल देशात हिंदूंनाच सण साजरे करण्यास कायमच आडकाठी कशासाठी ? – संपादक)