हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !

सांगली, ११ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात विविध प्रशासकीय कार्यालय, पोलीस विभाग, तसेच शिक्षण विभाग येथे निवेदन देण्यात आले.

१. जत येथे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुरेखा मिसाळ यांनी निवेदन स्वीकारले. समितीचे निवेदन सर्वत्र पाठवू, असे त्यांनी सांगितले. उप विभागीय कार्यालयात प्रांत अधिकारी प्रशांत आवटे यांना, उपतहसीलदार कार्यालयात उपतहसीलदार गुरुबसू लक्ष्मण शेट्टेप्पागोळ यांना, रामराव विद्यामंदिर येथे शिक्षक संभाजी सरक यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी शिक्षक संभाजी सरक म्हणाले, तुम्ही प्रसारित करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म विषयक पोस्ट मला पाठवा. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री गुरुबसव हत्ती, सौ. नीला हत्ती, सौ. अंबिका माळी, सौ. रुक्मिणी सपकाळ उपस्थित होत्या.

२. बत्तीसशिराळा येथे नायब तहसीलदार अरुणकुमार कोकाटे आणि पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी राजेंद्र खुर्द, राजवर्धन देशमुख, अशोक मस्कर उपस्थित होते.

शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !