नगरसेवक अभिजित भोसले ‘युथ लिडर इन हेल्थ केअर’ पुरस्काराने सन्मानित !

कोरोनाकाळात केलेले साहाय्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाकार्य यांविषयी नगरसेवक श्री. अभिजित भोसले यांना मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘युथ लिडर इन हेल्थ केअर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना-भाजप कार्यकर्ते यांनी दिल्या घोषणा !

मुख्यमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांची सायंकाळी सुटका केली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट !

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. सुमारे १५ मिनिटे बंद खोलीत ही चर्चा झाली.

तज्ञांची समिती नेमून पूर व्यवस्थापन, दरडी कोसळणे या अनुषंगाने उपाय शोधण्यात येतील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आपत्तीची वारंवारता पाहिली, तर त्यांचे स्वरूप भीषण होत आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचणे अशा घटना घडत असून निसर्गासमोर आपण सर्व हतबल आहोत. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले.

पूरग्रस्त भागात वीजदेयकांची वसुली नको ! – नितीन राऊत, ऊर्जामंत्री

परिस्थिती निवळल्यावर वीजदेयकात कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली.

नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

सांगली येथील आयर्विन पुलाची पाणीपातळी २९ जुलै या दिवशी दुपारी २ वाजता ३९ फूट नोंदवण्यात आली. सद्यस्थितीत धरण ८६ टक्के भरले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करून धरणाची….

अधिकाधिक हानीभरपाई मिळण्यासाठी संघर्ष करू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

वर्ष २०१९ मध्ये आमचे सरकार असतांना आम्ही निकषापलीकडे जाऊन साहाय्य केले. वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदाची हानी अधिक आहे. सर्वसामान्य माणसांपासून शेतकर्‍यांची अतोनात हानी झाली आहे.

पुढील ४ दिवसांत कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पुन्हा अतीवृष्टी होणार ! – हवामान विभागाची चेतावणी 

गेल्या आठवड्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे अतीवृष्टीने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे.

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल, तर ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम रहाणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, त्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत…

स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने सूचना दिल्याविना पुन्हा घरी परतू नये ! – नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली महापालिका

हवामान खात्याने या आठवड्यात कोयना धरण क्षेत्र आणि परिसर येथे अतीवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा ४० ते ४२ फुटांपर्यंत पोचण्यात शक्यता आहे.