पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने धरणे आंदोलन !

राजवाडा चौक येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने धरणे आंदोलन करतांना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते

सांगली, १८ ऑगस्ट – सांगलीत महापुरानंतर नागरिक आणि व्यापारी यांना साहाय्यासाठी वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना दिलेले धान्य किडके आणि खराब आहे. पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी १७ ऑगस्टला सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने राजवाडा चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांच्यासह पूरग्रस्त भागातील नागरिक, व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि हातगाडीवाले सहभागी झाले होते.