सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित : ‘ऑनलाईन’ सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद

कर्नाटकमधील पेजावर मठाचे अध्यक्ष स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी घेतली भेट !

स्वामीजींना हिंदी ‘सनातन पंचांग २०२२’ आणि ग्रंथ भेट देण्यात आले. त्यांनी ‘मला सनातन संस्थेचे कार्य ठाऊक आहे’, असे सांगत साधकांना आशीर्वाद आणि प्रसाद दिला.

मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनच्या साधिका कु. मंजुषा पै यांना सनदी लेखापाल परीक्षेत मिळाले ८४.५ टक्के गुण !

कु. मंजुषा पै या शिक्षण घेण्यासह सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सेवा आणि साधना करतात. त्यांना चांगले गुण मिळण्यास केवळ गुरुकृपाच कारणीभूत आहे’, असे त्यांच्या आई सौ. लक्ष्मी पै यांनी सांगितले.

वडगाव खुर्द (पुणे) येथील शिवकालीन श्री वडजाईमाता मंदिर येथे उत्सव पार पडला

उत्सवाच्या ठिकाणी सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. 

सनातनच्या सांगली येथील हितचिंतक सौ. मिनाक्षी जोग यांच्याकडून पुणे येथील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयास सनातन संस्थेच्या सुसंस्कार मालिकेचे ग्रंथ भेट !

हे ग्रंथ कु. चैतन्य अभिजीत जोगळेकर (वय ११ वर्षे) याच्याकडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर यांनी स्वीकारले.

सनातनचा बालसाधक कु. अर्णव कुलकर्णी याच्या जन्मदिनानिमित्त नू.म.वि. मराठी शाळेस सनातन संस्थेचे बालसंस्कार मालिकेतील ग्रंथ भेट !

वर्गशिक्षक श्री. मल्लीनाथ व्हंड्राव यांनी हे ग्रंथ स्वीकारले. या वेळी सनातन संस्थेचे ‘बोधकथा’, ‘टी.व्ही. मोबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा’, ‘गुण जोपासा आदर्श व्हा !’ आदी ग्रंथ या वेळी भेट देण्यात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या सनातनच्या ज्ञानमय आणि चैतन्यमय ग्रंथांचे स्तवन !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

सिंगापूर येथील धर्माभिमानी श्री. मनीष त्रिपाठी यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय

सिंगापूर येथील धर्माभिमानी श्री. मनीष त्रिपाठी यांनी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संशोधन केंद्र असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघमेळ्यामध्ये शास्त्र धर्म प्रचार सभेचे अनुयायी आणि सनातन संस्था यांचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची झाली भावस्पर्शी भेट !

नुकताच पार पडलेल्या माघमेळ्यात बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना शास्त्र धर्म प्रचार सभेच्या आश्रमाला सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी भेट दिली.