सनातनच्या सांगली येथील हितचिंतक सौ. मिनाक्षी जोग यांच्याकडून पुणे येथील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयास सनातन संस्थेच्या सुसंस्कार मालिकेचे ग्रंथ भेट !

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर (डावीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना कु. चैतन्य अभिजीत जोगळेकर आणि  पर्यवेक्षक श्री. विकास डिग्रजकर (मध्यभागी)

सांगली, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. मिनाक्षी जोग यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेल्या सुसंस्कार मालिकेचे २ संच (१४ ग्रंथ) पुणे येथील ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयास भेट दिले. हे ग्रंथ सौ. मिनाक्षी जोग यांचा इयत्ता ४ मधील नातू कु. चैतन्य अभिजीत जोगळेकर (वय ११ वर्षे) याच्याकडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर यांनी स्वीकारले. या वेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री. विकास डिग्रजकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणारी ही अमूल्य ग्रंथसंपदा शाळेस भेट दिल्याविषयी मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर यांनी सौ. मीनाक्षी जोग यांचे आभारपत्र देऊन धन्यवाद व्यक्त केले आहेत.