‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘दुपारी १.३० ते अनुमाने ५ – ६ वाजेपर्यंत रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा असायची. माझे पाय दुखतात आणि मला अन्य शारीरिक अडचणी आहेत. मी पाहुण्यांना आश्रम दाखवत असतांना देहभान विसरायचे. त्यामुळे माझ्या शारीरिक दुखण्याकडे माझे लक्ष जात नसे.

मातंग ऋषींच्या आश्रमाप्रमाणे रामनाथी येथील सनातनचा आश्रम हे गुरु-शिष्य भेटीचे ठिकाण असणे

‘२३.१.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथे सनातनच्या आश्रमात श्रीराम जन्मभूमीच्या संदर्भात एक प्रदर्शन आयोजित केले होते. त्यामध्ये शबरीचे गुरु मातंग ऋषि यांच्या आश्रमाचे प्रतीक म्हणून एक दगड ठेवला होता. तो पाहिल्यावर मी चैतन्याने न्हाऊन निघालो…

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ध्वजारोहण !

या वेळी राष्ट्रगीत गाण्यात आले, तसेच ‘भारतमाता की जय’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, तसेच ‘वन्दे मातरम्’ या घोषणा देण्यात आल्या.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त सहभागी झालेल्या सौ. सोनाली कोरटकर यांना आलेल्या अनुभूती

आश्रमात सगळीकडे मला चैतन्य जाणवले. ‘आश्रमातील प्रत्येक कण, झाडे, फुले यांमध्ये चैतन्य आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे माझ्या शरिराचा जडपणा न्यून होऊन मला साधनेसाठी प्रेरणा मिळाली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त  सहभागी झालेल्या साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘शिबिरातील तीनही दिवसांचे विषय आणि एकंदरीत रूपरेषाही सर्व साधकांचे व्यष्टी अन् समष्टी साधना यांचे प्रयत्न यामध्ये वृद्धी करणारी होती. आम्हा साधकांमध्ये ‘सकारात्मकता आणि उत्साह वाढवणारी अन् साधनेचा ध्यास निर्माण करणारी’, अशी रूपरेषा प्रतिदिन होती.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

सनातनचा रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचा स्रोत ! रामनाथी आश्रमातील साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) वििवध सेवांसाठी साधकसंख्या अपुरी पडत आहे. या सेवा करण्यासाठी शारीरिक क्षमता असलेल्या स्त्री आणि पुरुष साधकांची आवश्यकता आहे…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘अप्रतिम ! मी ‘सनातन धर्म’, असे केवळ ऐकून होतो; पण आज हा आश्रम पाहून मला वारकरी संप्रदायाचे भूषण श्री संत तुकोबाराय यांचा अभंग डोळ्यांपुढे उभा राहिला.

सातारा जिल्‍ह्यातील ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर यांच्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या भेटीची ठळक वैशिष्‍ट्ये !

ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर म्‍हणाले, ‘‘आमचे व्‍यसनमुक्‍तीचे कार्य चालू आहे. ‘आम्‍हाला तेच मोठे आहे’, असे वाटत होते; पण आश्रम पाहिल्‍यावर आमचे कार्य किती लहान (खुजे) आहे’, याची आम्‍हाला जाणीव झाली. आश्रमात आम्‍हाला जे शिकायला मिळाले, ते कृतीत आणण्‍याचा प्रयत्न आम्‍ही नक्‍की करणार आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘साधना शिबिरा’च्‍या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे झालेल्‍या ‘साधना शिबिरा’च्‍या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

रामनाथी, गोवा येथे झालेल्या एका शिबिरात सौ. ज्योती नीलेश कुंभार यांना आलेल्या अनुभूती

‘३ ते ७.१.२०२४ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.