‘१९ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘साधनावृद्धी शिबिर’ झाले. त्या शिबिरात सहभागी झालेल्या साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सौ. शैला कुलकर्णी, चिंचवड, पुणे.
१ अ. शिबिरातील रूपरेषा सर्व साधकांचे व्यष्टी अन् समष्टी प्रयत्न यामध्ये वृद्धी करणारी असणे : ‘शिबिरातील तीनही दिवसांचे विषय आणि एकंदरीत रूपरेषाही सर्व साधकांचे व्यष्टी अन् समष्टी साधना यांचे प्रयत्न यामध्ये वृद्धी करणारी होती. आम्हा साधकांमध्ये ‘सकारात्मकता आणि उत्साह वाढवणारी अन् साधनेचा ध्यास निर्माण करणारी’, अशी रूपरेषा प्रतिदिन होती.
२. सौ. ज्योत्स्ना नारकर, देवगड, सिंधुदुर्ग.
२ अ. साधिकेने केलेली भावपूर्ण प्रार्थना ऐकून अंतर्मुखतेत वाढ होणे : ‘जळगाव येथील सौ. जयश्री पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे) यांच्या भावपूर्ण प्रार्थनेतून ‘प्रार्थना कशी करावी ?’, हे मला शिकायला मिळाले. ‘ती प्रार्थना पुनःपुन्हा ऐकत रहावी’, असे मला वाटत होते. प्रार्थना ऐकल्यानंतर माझ्या अंतर्मुखतेत वाढ झाली. ‘मीही देवाशी असेच बोलत रहावे’, असे मला वाटले.’
३. श्रीमती शीतल नेर्लेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५५ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे.
३ अ. दायित्व असलेल्या साधकांनी अभ्यासपूर्ण आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणे : ‘श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४० वर्षे), श्री. चैतन्य तागडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३८ वर्षे) आणि सौ. अर्पिता पाठक हे तिघेही शिबिरात अभ्यासपूर्ण, तसेच साधकांच्या स्थितीला जाऊन अन् साधकांना त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ कसा होईल’, अशा प्रकारे मार्गदर्शन करत होते. ‘परात्पर गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित अशी ही सेवा व्हावी’, यासाठी असलेली त्यांची तळमळ मला शिकायला मिळाली.’ (सर्व सूत्रांचा दिनांक : २१.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |