रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त सहभागी झालेल्या सौ. सोनाली कोरटकर यांना आलेल्या अनुभूती

१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘साधनावृद्धी शिबिर’ झाले. त्या शिबिरात सहभागी झालेल्या साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सौ. सोनाली राजू कोरटकर

 

१ अ. जाणवलेली सूत्रे

१. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर ‘मी भूवैकुंठात आले आहे’, असे मला वाटले. त्या वेळी माझे मन आनंदी झाले.

२. आश्रमात सगळीकडे मला चैतन्य जाणवले. ‘आश्रमातील प्रत्येक कण, झाडे, फुले यांमध्ये चैतन्य आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे माझ्या शरिराचा जडपणा न्यून होऊन मला साधनेसाठी प्रेरणा मिळाली.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रीती प्रत्येक साधकामध्ये अनुभवता आली.

४. घरी माझ्या मुलाची प्रकृती ठीक नाही, तरी मला स्थिर रहाता आले आणि ताण आला नाही.

५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, तसेच नामजपादी उपाय यांचे गांभीर्य माझ्या लक्षात आले.

६. मला देवाच्या अनुसंधानात रहाता आल्यामुळे माझे मन अंतर्मुख होऊन माझा नामजप गुणात्मक झाला. आश्रमात आल्यावर माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती सतत कृतज्ञता व्यक्त होत आहे.

१ आ. श्रीकृष्ण वात्सल्यभावाने पाहून स्मितहास्य करत असल्याचे जाणवणे आणि त्याच्या सुदर्शन चक्रातून पुष्कळ शक्ती मिळणे : आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राचे दर्शन घेतांना ‘श्रीकृष्ण माझ्यासमोर प्रत्यक्ष उभा आहे आणि तो माझ्याकडे वात्सल्यभावाने पाहून स्मितहास्य करत आहे’, असे मला जाणवले. ‘हिंदु राष्ट्र लवकर यावे आणि माझ्याकडून अधिकाधिक सेवा व्हावी, यांसाठी श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रातून मला पुष्कळ शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवले.’

– सौ. सोनाली राजू कोरटकर, छत्रपती संभाजीनगर (२८.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक