देहू (पुणे) येथे संत श्री तुकाराम महाराज बीजेची जोरात सिद्धता !

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा ९ मार्च या दिवशी होत आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पूर्ण सिद्धता करण्यात येत आहे. भाविकांकरिता आरोग्य, निवारा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय संस्थानने केली आहे.

महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचा देहत्याग !

५ मार्चला दुपारी ४ वाजता सातारा येथील जावळी तालुक्यातील कापसेवाडी येथे त्यांचा समाधी सोहळा होईल. प.पू. महाराज हे श्री पंच दशनाम जुना आखाडा परिषदेमध्ये सक्रीय होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा शिष्य परिवार आहे.

संतांनी मराठी भाषा सुंदर ठेवली ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादी अगदी श्रीगोंदेकर, शेख महम्मदबाबांसह सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली.

देश आणि जग यांना उपयुक्त ठरेल, असा पंचमहाभूत लोकोत्सव ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खाते

पंचमहाभूत लोकोत्सवा’चा समारोप ! 30 लाख लोकांच्या भेटीने पुरोगामी आणि साम्यवादी यांना चपराक ! कोल्हापूर, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी समाजहित, देशहित यांचे कार्य करत आहेत. या महोत्सवात ३० लाखांपेक्षा अधिक लोक येऊन गेले. या कार्यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. या लोकोत्सवाच्या माध्यमातून शिकून घेऊन त्याचा उपयोग मी राज्य आणि देश … Read more

अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी

पूर्वीच्या काळी विविध कामांसाठी देववन, ग्रामवन, राजावन आणि वैद्यवन अशा वनांची निर्मिती होत होती. आताच्या काळातही आयुर्वेदिक वनस्पतींच्या निर्माणासाठी अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक आहे.

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त पू. सदानंद भस्मे महाराज यांचा देहत्याग !

येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शिवानंद कुटीर येथे देहत्याग केला.

पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात रूपांतर करून सकारात्मक पालट घडवूया ! – आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात

भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !

केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

पुणे येथील थोर संत प.पू. श्रीकृष्‍ण कर्वेगुरुजी यांचा देहत्‍याग !

धार्मिक आणि ज्‍योतिषतज्ञ प.पू. श्रीकृष्‍ण कर्वेगुरुजी यांनी २२ फेब्रुवारीच्‍या मध्‍यरात्री २ वाजता वयाच्‍या ९६ व्‍या वर्षी देहत्‍याग केला. तळेगाव दाभाडे येथील निवासस्‍थानी त्‍यांची प्राणज्‍योत मालवली.

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !