साधनेतील प्रगती स्वतःच्या प्रयत्नांवरच अवलंबून असते !

सूर्य उगवला की, त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि तो सर्वांना दिसतोच. त्याप्रमाणे साधकाची साधना अंतर्मनातून चांगली चालू असेल, तर त्याच्या अंतरातील साधना-दीप प्रदीप्त होतो आणि त्याचा प्रकाश पसरून तो दिसतोच.

सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांचे साधनेविषयी मौलिक मार्गदर्शन !

‘मी जन्मोजन्मी भगवंताचा शोध घेत होतो. एकदा भगवंताच्या दारी पोचलो. दार ठोठावणार इतक्यात घाबरलो; कारण भगवंताला भेटल्यानंतर माझा ‘मी’पणा नाहीसा होईल. मीच उरणार नाही तेव्हापासून ‘भगवंत नाही’, अशा ठिकाणीच त्याचा शोध घेतो.’

‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर सिद्ध करणार्‍या सद्गुरु (सौ.) सखदेवआजी !

वर्ष २०१५ मध्ये पू. सखदेवआजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतांना उपाय करण्यासाठी नामजप, न्यास आणि मुद्रा शोधत. त्या वेळी पू. आजींनी शोधलेले उत्तर आणि मी शोधलेले उत्तर ९० टक्के वेळा एकच असे. यावरून ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर प्रकर्षाने सिद्ध होते.

आपण अंतर्मुख झाल्यास ‘आपण कसे आहोत’, याची सम्यक कल्पना येते !

स्वतःविषयीच्या आपल्या कल्पना फार मोठ्या असतात; पण आपण अंतर्मुख झालो, म्हणजे भव्य-दिव्य आरशात आपण आपल्याला पाहू शकतो आणि आपण कसे आहोत, याची आपणास सम्यक कल्पना येते.’

भगवंताच्या आड येणार्‍या पत्नीचा त्याग करण्यास सांगणारे श्रीरामकृष्ण परमहंस !

श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको !

‘संतोष’ हीच मनुष्याची खरी संपत्ती !

ज्याचे मन संतुष्ट आहे, त्याच्याकडेच खरी संपत्ती आहे. ज्याने पायात पादत्राण घातले आहे, त्याच्या दृष्टीने जणू सर्व पृथ्वीच चामड्याने झाकलेली आहे

गुढीकडून घ्यावयाचा बोध

गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्‍वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करते अन् इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते.