ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची शिकवण

तुमच्या आयुष्यातील जे रिकामे क्षण आहेत, तेवढे जरी तुम्ही नाम घेत भगवंताला अर्पण केले, तरीसुद्धा तो नामधारकांचा दास होऊन रहातो !

देव, दानव आणि मानव यांच्यासाठी गुरूंचे महत्त्व

‘भगवान श्रीकृष्ण गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतात, आपल्या गुरूंकडे जातात. देवतागण आपले गुरु श्री बृहस्पतींचे पूजन करतात. दैत्यगणही आपले गुरु श्री शुक्राचार्यांचे पूजन करतात.’

मानवी जीवनाचे अंतिम लक्ष्य

प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि अंतःप्रकृती यांचे नियमन करून स्वतःतील मूळचे ब्रह्मरूप प्रकट करणे, हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य होय !

मनाचे पावित्र्य टिकल्यास परमेश्वर साहाय्य करत असल्याने मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा !

‘घर कितीही स्वच्छ असले, तरी त्याची नियमित झाडलोट करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मनाचे पावित्र्य टिकवण्यासाठी प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.

आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून अनुसंधान अखंड टिकू द्या !

भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्याने होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

 ‘मनुष्य स्वतःच्या पूर्वकर्माप्रमाणे इतरांना भेटतो किंवा कुणाच्या तरी ओळखीने एकमेकांस पारखत असतो.’

नास्तिकतावादीही सश्रद्ध असतात !

मी माझ्या बुद्धीने जेवढा विचार करतो, त्या विचारांच्या क्षेत्रात कुठे देव आहे, असे जाणवत नाही; पण माझ्या बुद्धीच्या कक्षेत येते, तेवढेच खरे असेही मी मानू शकत नाही. माझ्या बुद्धीच्या पलीकडे काही म्हणून असणारच – केरूनाना, सज्जन आणि प्रामाणिक !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

आपल्या उणिवांची जाणीव असणे’, ही सर्वांत महान विद्या आहे, तर ‘स्वतःला बुद्धीमान समजणे’, ही सर्वांत मोठी अविद्या होय.

नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घेण्याचे महत्त्व !

नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंत:करणाने आपण नाम घेतले, म्हणजे आपले काम शीघ्र होते. भगवत्प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे, म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे. आपल्या पैशावर स्वतःची सत्ता नाही, आपल्या माणसांवर स्वतःची सत्ता नाही. म्हणून स्वतःचे कर्तव्य तेवढे करावे आणि ते करत असतांना स्वतःचे मन दुश्चित्त होऊ देऊ नये. … Read more