ईश्वराला कुणी उत्पन्न केले, हे विचारण्याची आवश्यकताच काय ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती

सृष्टीच्या मुळाशी ईश्वर आहे; पण ‘मग ईश्वराच्या मुळाशी कोण ? सृष्टी ईश्वराने उत्पन्न केली; पण ईश्वराला कुणी उत्पन्न केले ?’, हा काय प्रश्न आहे का ? ‘सगळ्याचा उत्पत्तीकर्ता तो ईश्वर’, अशी व्याख्या केली जाते, तेव्हा त्याचा उत्पत्तीकर्ता कोण, हे विचारायचे काय कारण आहे ? व्यवहारात आपण कुठे तरी थांबतो कि नाही ? हे घर पाहिले, घर कुणी बांधले ? अमक्या अमक्यांनी बांधले. त्याचा बाप कोण ? विचारायचे काही कारण आहे का ?

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ‘अक्षरब्रह्मयोग (भगवद्गीता अध्याय ८ वा)’ या ग्रंथातून)