नाम हा माझा प्राण आहे !
एक मुलगा श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) म्हणाला, ‘महाराज इतर देव मला आवडत नाहीत. आपणच मला देव आहात आणि आपण मला भेटला, मग नाम कशाला घ्यायचे ?’…
एक मुलगा श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) म्हणाला, ‘महाराज इतर देव मला आवडत नाहीत. आपणच मला देव आहात आणि आपण मला भेटला, मग नाम कशाला घ्यायचे ?’…
प्रश्न संपत नाहीत; कारण देह हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. कसे, केव्हा, का आणि कुठे (How, When, Why and Where) या शब्दांवर माणूस कर्म चालवत असतो. त्यामुळे विचार स्वस्थ, म्हणजेच आत्मलीन होत नाहीत.
नवीन लग्न झालेल्या भक्ताच्या मुलाची बायको मुदतीच्या तापाने (‘टायफॉईड’ने) आजारी पडली. तो मुलगा श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) भेटला. तेव्हा ते म्हणाले, ‘राम तिला बरी करील.
गुरुतत्त्व अवर्णनीय आहे. ते बुद्धीगम्य नाही. ते अंतरंगात अनुभवावयाचे आहे. ते सर्वव्यापी आहे. ते नाही अशी जागा या जगात आणि परलोकातही नाही.
‘दुर्बुद्धी ते मना। कदा नुपजो नारायणा ।।’, या अभंगावर एका हरिदासाने कीर्तन केले. कीर्तन आटोपल्यावर श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) म्हणाले, ‘बुवा, फार छान अभंग काढला. भगवंतापासून जीवाला जी दूर नेते ती ‘दुर्बुद्धी’.
व्यवहारात आपण कुठे तरी थांबतो कि नाही ? हे घर पाहिले, घर कुणी बांधले ? अमक्या अमक्यांनी बांधले. त्याचा बाप कोण ? विचारायचे काही कारण आहे का ?
‘मनुष्यजन्मात केवळ एकच कर्म असते, जे गुरुकृपेनेच होऊ शकते आणि ते म्हणजे साधना करणे !’
बापूसाहेब साठये यांना श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) एकदा म्हणाले, ‘बापूसाहेब, तुमच्या आयुष्यातील प्रमुख घटना कोणत्या ते सांगा.’…
ईश्वर नित्य मुक्त आहे. सकाम कर्म केले आणि भगवंताकडे फळ मागितले, तर ते तो अवश्य देतो; पण ते फळ बद्ध करते, अंगलट येते. फळच मागितले नाही, तर फळ देण्याचे ईश्वराचे स्वातंत्र्य कायम रहाते. योग्य वेळी जेव्हा प्रारब्ध अनुकूल असेल, तेव्हा तो फळ देतो. ते अनेक पटींनी फळते.