सर्व कर्तेपण रामाकडेच द्यावे !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

नवीन लग्न झालेल्या भक्ताच्या मुलाची बायको मुदतीच्या तापाने (‘टायफॉईड’ने) आजारी पडली. तो मुलगा श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) भेटला. तेव्हा ते म्हणाले, ‘राम तिला बरी करील. आपण काळजी करू नये.’ त्यावर तो म्हणाला, ‘मी तिला बरी करीन, असे आपण म्हणा, म्हणजे माझे समाधान होईल.’ ते ऐकून श्रीमहाराज म्हणाले, ‘ज्या शब्दांनी मी माझी जीभ आजन्म विटाळली नाही. ते शब्द मी बोलावे, असे तू कसे म्हणतोस ? राम तिला बरी करील, यात संशय बाळगू नये.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)