
‘दुर्बुद्धी ते मना। कदा नुपजो नारायणा ।।’, या अभंगावर एका हरिदासाने कीर्तन केले. कीर्तन आटोपल्यावर श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) म्हणाले, ‘बुवा, फार छान अभंग काढला. भगवंतापासून जीवाला जी दूर नेते ती ‘दुर्बुद्धी’. हे लक्षात ठेवण्यास अगदी सोपे आहे.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)