सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘सतत शिकण्याच्या स्थितीत कसे रहायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन !
एकदा सद़्गुरु राजेंद्र शिंदे मला म्हणाले, ‘‘सतत शिकण्याच्या स्थितीत रहाण्यासाठी प्रथम आपली दृष्टी तशी बनवणे आवश्यक आहे. जसे श्री दत्तगुरूंनी २४ गुणगुरु केले होते, तसे आपणही प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूकडून शिकले पाहिजे, उदा. पंखा, वारा इत्यादी.