जाणून घ्या – पुतिन यांनी ‘राष्ट्र’ म्हणून मान्यता दिलेल्या डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या प्रांतांविषयी !

रशियाचा घनिष्ठ मित्र असलेल्या बेलारूसमध्ये सध्या रशियाच्या काही तुकड्या युद्धसरावासाठी दाखल झाल्या आहेत. या तुकड्या सरावाची मुदत संपून गेल्यानंतरही बेलारूसमध्येच ठाण मांडून आहेत.

रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव न्यून करण्याला प्राधान्य द्यावे ! – भारत

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढणे, हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. हा तणाव न्यून करण्याला त्वरित प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीने बोलावलेल्या बैठकीत भारताने मांडली.

रशियाकडून युक्रेनमधील दोन प्रांतांना ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून मान्यता !

रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ ! रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाची शक्यता पहाता भारताने आतापासून पूर्ण सिद्धता केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

रशिया युक्रेनच्या कोणत्या नागरिकांची हत्या करणार, याची सूची सिद्ध ! – अमेरिकेचे दावा

रशिया युक्रेनच्या कोणत्या नागरिकांची हत्या करणार अथवा कुणाला कह्यात घेणार, याची सूची सिद्ध केली आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.

रशियासमर्थक फुटीरतावाद्यांच्या आक्रमणात युक्रेनचे २ सैनिक ठार ! – युक्रेनचा दावा

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या सीमासंघर्षाने आता जणू युद्धाचे स्वरूप घेतले आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये युक्रेनचे २ सैनिक ठार, तर ४ जण घायाळ झाले, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.

युक्रेन-रशिया वादात भारताची भूमिका !

भारत शांतपणे अमेरिका आणि रशिया यांच्याशी बोलत राहील अन् संयुक्त राष्ट्राचेही साहाय्य घेईल. अशा पद्धतीने मुत्सद्देगिरीच्या जोरावर युद्धाची शक्यता अल्प करत नेण्याचा भारत प्रयत्न करील. असे झाले, तर हे युक्रेनला भारताचे मिळालेले सर्वात चांगले साहाय्य असेल !

युक्रेनमध्ये फुटीरतावाद्यांनी सुरक्षाप्रमुखांची चारचाकी गाडी बाँबद्वारे उडवली !

येथे रशियाचे समर्थक असणार्‍या युक्रेनमधील फुटीरतावाद्यांनी एका सुरक्षाप्रमुखाच्या चारचाकी गाडीमध्ये स्फोट घडवून आणला. तसेच एक गॅस पाईपलाईनही फोडण्यात आली.

रशियाने आक्रमण केल्यास युक्रेनला साहाय्य करू ! – जो बायडेन

आम्हाला संघर्ष नको आहे; परंतु रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर आम्ही युक्रेनला साहाय्य करू. युक्रेनवर आक्रमण करणे चुकीचे असून विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी रशिया उत्तरदायी राहील अशी चेतावणी देणारे ट्वीट जो बायडेन यांनी केले.

रशियाकडून अमेरिकेच्या दूतावासातील उच्चाधिकार्‍याची हकालपट्टी

‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सीमेसाठी कटीबद्ध असणारा भारत अमेरिकेला सहकार्य करील’.

रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य परत बोलावले नसून उलट ७ सहस्र सैनिक वाढवले आहेत ! – अमेरिकेचा दावा

या दाव्याला ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख जिम हॉकेनहल यांनीही दुजोरा दिला आहे.