मॉस्को (रशिया) – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाला स्वस्त दराने इंधन तेल देण्यासाठी पत्र लिहिले होते; मात्र रशियाने त्याला अद्याप अनुमती दिलेली नाही. यापूर्वी रशियाने स्वतःहून भारताला स्वस्तात इंधन तेल देण्याचा प्रस्ताव दिला होता आणि तो भारताने स्वीकारलाही होता. त्याचप्रमाणे पाकलाही तेल मिळावे, यासाठी पाकने प्रयत्न केला; मात्र त्याला रशियाने अद्याप भीक घातलेली नाही.
पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल म्हणाले की, जर अमेरिकेच्या निर्बंधांची भीती नसेल, तर आम्ही रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करू. रशियाने भारताप्रमाणे पाकला स्वस्तात तेल देण्याचा प्रस्ताव दिलेला नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.