कीव (युक्रेन) – युद्ध संपल्यानंतर देशाच्या पुनर्उभारणीसाठी भारताकडून साहाय्य मिळावे, अशी अपेक्षा युक्रेनकडून व्यक्त करण्यात आली आहे. ‘द हिंदु’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या याविषयीच्या वृत्तानुसार, युक्रेनच्या एका प्रशासकीय अधिकार्याने ‘भारताने पुनर्उभारणीसाठी औषधे, तसेच तांत्रिक आणि आर्थिक साहाय्य करण्यात मोठ्या प्रमाणात साहाय्य केल्यास अधिक चांगले होईल’, असे आवाहन केले आहे. युद्धानंतर भारताने युक्रेनच्या संरक्षणाची हमी घ्यावी, असे दोन मासांपूर्वी त्यांचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी भारताला आवाहन केले होते.