युद्धामध्ये आतापर्यंत युक्रेनच्या १० सहस्र सैनिकांचा मृत्यू

कीव (युक्रेन) – रशियाशी युद्धाला प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनच्या १० सहस्र सैनिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेेलेंस्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी दिली. या युद्धाला १०९ दिवस झाले आहेत.

दुसरीकडे रशियाने मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. रशियाने २५ मार्च २०२२ या दिवशी ‘युक्रेनसमवेतच्या युद्धात आमचे १ सहस्र ३५१ सैनिक मारले गेले आहेत’, असे सांगितले होते. त्यानंतर आतापर्यंत त्याने काहीच सांगितलेले नाही. अमेरिका आणि इतर काही पाश्‍चात्त्य गुप्तचर संस्थांच्या मते आतापर्यंत रशियाने १० सहस्र सैनिक गमावले आहेत, तर युक्रेनकडून मात्र १० जूनपर्यंत रशियाचे अनुमाने ३१ सहस्र ९०० सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे.